भारत की पाकिस्तान, कोणाचं पारडं जड? पाहा Head to Head रेकॉर्ड

Pranali Kodre

भारत विरुद्ध पाकिस्तान

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत २३ फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने येणार आहेत.

India vs Pakistan | Sakal

दुबई

हा सामना दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगणार आहे.

Team India | Sakal

उत्साहाचे वातावरण

भारत आणि पाकिस्तान संघ जेव्हाही आमने-सामने असतात, तेव्हा चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते.

Team India | Sakal

वनडेमध्ये आमने-सामने

या दोन संघात आत्तापर्यंत वनडेमध्ये १३५ सामने झाले आहेत, त्यामध्ये भारताने ५७ सामन्यांत विजय मिळवला आहे, तर पाकिस्तानने ७३ सामने जिंकले आहेत. ५ सामने अनिर्णित राहिलेत.

India vs Pakistan | Sakal

वरचढ

दोन संघातील एकूण आमने-सामने आकडेवारीमध्ये पाकिस्तान वरचढ दिसत असले तरी गेल्या १० वर्षात भारताचे वर्चस्व राहिल्याचे दिसले आहे.

India vs Pakistan | Sakal

गेल्या १० वर्षात...

गेल्या १० वर्षात म्हणजेच २०१५पासून या दोन संघात ९ वनडे सामने झाले असून ७ सामने भारताने जिंकले आहेत, तर १ सामने पाकिस्तानने जिंकला आहे. १ सामना अनिर्णित राहिला आहे.

India vs Pakistan | Sakal

चॅम्पियन्स ट्रॉफी

तसेच भारत आणि पाकिस्तान संघ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आत्तापर्यंत ५ सामने झाले असून २ सामने भारताने जिंकलेत, तर ३ सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

India vs Pakistan | Sakal

दुबईतील सामने

दुबईमध्ये झालेल्या दोन वनडे सामन्यात भारतानेच पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.

India vs Pakistan | Sakal

१७ ICC स्पर्धा अन् बदलत गेलेलं हिटमॅनचं रुप, पाहा फोटो

Rohit Sharma in ICC Tournaments | Instagram
येथे क्लिक करा