Pranali Kodre
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट पाकिस्तानविरुद्ध पुन्हा तळपली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत २३ फेब्रुवारीला दुबईत झालेल्या सामन्यात विराटने शतक करत भारताला पाकिस्तानविरुद्ध ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
विराटने या सामन्यात १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली.
विराटचे वनडेमधील हे ५१ वे शतक आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ८२ वे शतक आहे.
दरम्यान, विराटने ही खेळी करण्यापूर्वी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या खिलाडूवृत्तीने सर्वांची मनं जिंकली.
पाकिस्तान संघ फलंदाजी करत असताना ४६ व्या षटकात विराट नसीम शाहच्या शुजची लेस बांधताना दिसला होता.
खुशदील शाहसोबत फलंदाजी करत असताना नसीम शाहची शुजची लेस सुटली. हे विराटच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने लगेचच त्याची लेस बांधली.
विराटच्या या कृतीचे सध्या कौतुक होत आहे.