Virat Kohli: पाकिस्तानला पुन्हा नडला भारताचा चेस मास्टर; केले ३ मोठे विक्रम

Pranali Kodre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारतीय संघाने २३ फेब्रिवारी रोजी पाकिस्तानला पराभूत करत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

Virat Kohli | Sakal

मोलाचा वाटा

या विजयात विराट कोहलीने शतक करत मोलाचा वाटा उचलला.

Virat Kohli | Sakal

विराटचं शतक

विराटने १११ चेंडूत १०० धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला.

Virat Kohli | Sakal

सामनावीर

विराटने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक ५ वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे. तसेच वनडेतील ४२ वा सामनावीर पुरस्कार आहे. त्यामुळे सचिन तेंडुलकरनंतर सर्वाधिकवेळा वनडेत सामनावीर जिंकणारा तो भारतीय खेळाडू आहे.

Virat Kohli | Sakal

१४ हजार धावा

विराटने या खेळीदरम्यान १४ हजार धावा देखील पूर्ण केल्या.

Virat Kohli | Sakal

तिसरा फलंदाज

विराट सचिन तेंडुलकर (१८४२६ धावा) आणि कुमार संगकारा (१४२३४ धावा)यांच्यानंतर १४ हजार धावा करणारा तिसराच फलंदाज आहे.

Virat Kohli | Sakal

विराटची शतकं

विराटचे हे वनडेतील ५१ वे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ८१ वे शतक ठरले आहे.

Virat Kohli | Sakal

८२ वे शतक

विराट वनडेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा सचिननंतरचा (१०० शतके) दुसरा फलंदाज आहे.

Virat Kohli | Sakal

पाँटिंगला टाकलं मागे

याशिवाय विराट आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाराही तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याचे आता २७५०३ धावा झाल्या असून त्याने पाँटिंगच्या २७४८३ धावांना मागे टाकले आहे.

Virat Kohli | Sakal

तिसरा क्रमांक

विराटच्या पुढे आता फक्त सचिन तेंडुलकर (३४३५७ धावा) आणि कुमार संगकारा (२८०१६ धावा) आहेत.

Virat Kohli | Sakal

एमएस धोनी 'या' गोष्टीला सर्वात जास्त घाबरतो, स्वत:च सांगितलं

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा