Mayur Ratnaparkhe
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी देशवासियांना संबोधित केलं.
यावेळी ऑपरेशन सिंदूर आणि भारत सरकारच्या कामांचे कौतुक केलं.
१५ ऑगस्ट हा केवळ स्वातंत्र्य पर्व नाहीये तर प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचे प्रतीक आहे.
संविधान आणि लोकशाही हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे. या दोन्ही गोष्टी आमच्या ताकद सुद्धा आहेत, असं राष्ट्रपती म्हणाल्या.
दहशतवादाविरुद्ध मानवतेच्या लढाईचे उदाहरण म्हणून इतिहासात ऑपरेशन सिंदूरची नोंद केली जाईल.
ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम हल्ल्याचं चोख प्रत्युत्तर होते. या ऑपरेशनमुळे भारतीय लष्कर देशाचं संरक्षण करण्यास सक्षम असल्याचं सिद्ध झालं.
२०४७ पर्यंत विकसित राष्ट्रजागतिक अर्थव्यवस्थेतील तणाव असूनही, देशांतर्गत मागणी वेगाने वाढत आहे.
सामाजिक क्षेत्रात केल्या गेलेल्या उपाययोजनांसह सर्वांगीण आर्थिक विकासामुळे, भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्याच्या मार्गावर आहे.