Mansi Khambe
आपल्याला मावळत्या सूर्याकडे किंवा उगवत्या सूर्याकडे पाहून दिवस आहे की रात्र, हे ओळखू शकतो. तसेच आपल्याला आजूबाजूला काय घडत आहे, याचीही माहिती मिळते.
Blind People Recognize Day & Night
ESakal
पण जे लोक पाहू शकत नाहीत त्यांना दिवस आणि रात्र कशी समजते? तसेच वातावरणात होणारे बदल त्यांना कसे कळतात? याबाबत जाणून घ्या.
Blind People Recognize Day & Night
ESakal
दृष्टिहीन व्यक्तींकडे वेळेचा अचूक अंदाज लावण्यासाठी एक नैसर्गिक प्रणाली असते. मानवी शरीराची अद्वितीय जैविक रचना, मेंदूचे संकेत, हार्मोन्स आणि सभोवतालच्या वातावरणामुळे त्यांना वेळ समजते.
Blind People Recognize Day & Night
ESakal
असे मानले जाते की जे लोक पाहू शकत नाहीत त्यांना फक्त गडद अंधार दिसतो. तर बहुतेक लोकांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात प्रकाश जाणवतो. ज्यामुळे ते दिवस-रात्र सहज ओळखू शकतात.
Blind People Recognize Day & Night
ESakal
पूर्णपणे दृष्टिहीन लोकांमध्ये एक २४-तासांचे अंतर्गत जैविक घड्याळ म्हणजेच 'सर्केडियन रिदम' असतो. आपल्याला पाहण्यास मदत करणाऱ्या रॉड्स आणि कोन्स तसेच डोळ्यांमधील ipRGC पेशी देखील असतात.
Blind People Recognize Day & Night
ESakal
सर्वसामान्यांप्रमाणे दृष्टिहीन व्यक्तींनाही डोळ्यांमध्ये ipRGC पेशी असतात, ज्यात मेलानोप्सिन नावाचे एक विशेष रंगद्रव्य असते. या प्रकाश ओळखतात आणि मेंदूच्या मध्यवर्ती भागाला (SCN) वेळेचे संकेत पाठवतात.
Blind People Recognize Day & Night
ESakal
जेव्हा मेंदूच्या SCN भागाला प्रकाश किंवा अंधाराचे संकेत मिळतात, तेव्हा शरीरातील मेलाटोनिन नावाच्या हार्मोनची पातळी बदलते. हा हार्मोन आपल्या झोपण्याच्या आणि जागे होण्याच्या चक्रांवर नियंत्रण ठेवतो.
Blind People Recognize Day & Night
ESakal
जैविक घटकांव्यतिरिक्त, दृष्टिहीन व्यक्ती वेळेचा अचूक अंदाज घेण्यासाठी त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाचा आणि आवाजाचा देखील वापर करतात.
Blind People Recognize Day & Night
ESakal
सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट, रस्त्यावरील वाहतुकीचा आवाज हे सर्व त्यांना दिवसाची सुरुवात झाल्याचे सांगतात. तर रात्रीच्या वेळी वातावरणातील शांतता आणि वाहनांचा मंद आवाज रात्र झाल्याचे संकेत देतात.
Blind People Recognize Day & Night
ESakal
हवामान आणि तापमानात होणारे बदल देखील शरीराला वेळ जाणण्यास मदत करतात. सकाळचा गारवा, दुपारची उष्णता आणि रात्रीची थंड वारा त्यांना वेळ समजण्यास मदत करतात.
Blind People Recognize Day & Night
ESakal
याव्यतिरिक्त, आजच्या आधुनिक युगात बोलणारी घड्याळे आणि गूगल होम किंवा अलेक्सासारख्या स्मार्ट एआयमुळे दृष्टिहीन व्यक्तींना फक्त एका क्लिकवर वेळ आणि हवामान जाणून घेणे सोपे होते.
Blind People Recognize Day & Night
ESakal
Air vent pipe
ESakal