Monika Shinde
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य मिळालं. हा दिवस आपल्या देशाच्या स्वातंत्र्य संघर्षाचा विजय दिवस आहे.
भगतसिंग, नेहरू, गांधीजी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतिकारकांना वंदन करा. त्यांच्यामुळेच आपण आज स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत.
तिरंग्याचा आदर राखा. योग्य पद्धतीने ध्वजारोहण करा आणि राष्ट्रगीत म्हणताना उभं राहून आदर दाखवा.
देशभक्तीच्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करताना अचूक माहिती आणि आदर राखून वागा. चुकीच्या गोष्टी पसरवू नका.
तिरंग्याचा अपमान होईल अशा ठिकाणी तो ठेवू नका जसे की रस्त्यावर, जमिनीवर किंवा कोपऱ्यात.
आपल्या गावातील, राज्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाची माहिती घ्या आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा.
स्वातंत्र्यदिन साजरा करताना फटाके न वापरता पर्यावरणपूरक आणि शांततेत साजरा करा. हरित क्रांती हाच पुढचा टप्पा.
या दिवशी खादी किंवा भारतीय वस्त्र परिधान करून स्वदेशीला प्रोत्साहन द्या. ‘वोकल फॉर लोकल’ या विचाराला साथ द्या.
स्वातंत्र्य ही केवळ साजरी करण्याची गोष्ट नाही. ती जबाबदारीही आहे. कायद्याचं पालन करा आणि देशहितासाठी नेहमी तयार रहा.