Monika Shinde
प्राचीन योगपद्धतीतील त्राटक ही क्रिया मन, शरीर आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी प्रभावी मानली जाते. चला जाणून घेऊ या तिचे महत्त्वाचे फायदे.
त्राटक केल्याने मन स्थिर होते आणि विचारांमध्ये स्पष्टता येते. अभ्यास, काम किंवा ध्यानात अधिक एकाग्रता मिळते, मानसिक कार्यक्षमता वाढते.
नियमित त्राटक केल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते. नेत्रपटल मजबूत होतो व डोळ्यांवरील ताण कमी होतो, चष्म्याचा नंबरही कमी होऊ शकतो.
ही क्रिया मन शांत ठेवण्यास मदत करते. स्ट्रेस, चिंता, आणि नकारात्मक विचार दूर होतात. ध्यानासाठी आदर्श अशी ही कृती आहे.
त्राटक केल्याने झोपेचे चक्र सुरळीत होते. अनिद्रेतून त्रस्त असाल, तर ही क्रिया झोपेपूर्वी केल्यास चांगले परिणाम दिसतात.
दीर्घकालीन सरावाने अंतर्मनाशी नाते दृढ होते. त्यामुळे निर्णयक्षमता वाढते आणि अंतर्ज्ञान विकसित होते. मानसिक जागरूकता वाढते.
त्राटक केवळ शारीरिक किंवा मानसिकच नाही, तर आध्यात्मिक उन्नतीसाठीही उपयुक्त आहे. आत्मचिंतन व आत्मदर्शनाचा मार्ग सुलभ करतो.