सकाळ डिजिटल टीम
स्वातंत्र्यदिनाला (१५ ऑगस्ट) तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो. नंतर पंतप्रधान ध्वजाला दोरीने वर नेत मग फडकवतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सन्मानार्थ ध्वजारोहण केले जाते.
तर, प्रजासत्ताकदिनाला (२६ जानेवारी ) ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूला बांधला जातो. त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो. देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ही कृती केली जाते.
स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.
तर, प्रजासत्ताक दिनाचा सोहळा राजपथावर होता व राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात.
स्वातंत्र्यादिनाला ध्वजारोहण लाल किल्ल्यावर होते व पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून जनतेला संबोधित करतात.
तर, प्रजासत्ताक दिनाला भारतीय सुरक्षादलाच्या तिन्ही दलांची परेड होते. तसेच राज्य व केंद्रशासित प्रदेशांची राजपथावर परेड होते.