भारतातील एका रात्रीत संपूर्ण गाव झालं रिकामं; आजही तिथे कोणी राहत नाही

Varsha Balhe

गावं

भारतात अशी अनेक गावं आहेत, ज्यांचा इतिहास खूप वेगळा आहे. भारतामध्ये असंच एक गाव आहे, जिथे आज अनेक घरं रिकामी पडली आहेत. विशेष म्हणजे, हे संपूर्ण गाव एका रात्रीत रिकामं झाल्याचं सांगितलं जातं.

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

कुलधरा गाव कुठे आहे?

राजस्थानमधील जैसलमेर शहरापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर कुलधरा हे गाव आहे. थार वाळवंटाच्या परिसरात असलेल्या या गावात आजही जुन्या घरांचे अवशेष पाहायला मिळतात.

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

गावात पूर्वी कोण राहत होतं?

कुलधरा गावात पूर्वी पालीवाल ब्राह्मण समाजातील लोक राहत होते. गावात अनेक घरं, मंदिरं आणि सुंदर बांधकामं होती. एकेकाळी हे गाव चांगलं वसलेलं होतं.

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

आज गावात कोणीच का राहत नाही?

या गावाची सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे इथली संपूर्ण वस्ती अचानक गायब झाली. गावातील लोकांनी आपली घरं सोडली आणि ते दुसरीकडे निघून गेले.

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

MYSTERIOUS VILLAGE IN INDIAएका रात्रीत नेमकं काय घडलं?

लोककथेनुसार, जैसलमेरचा दिवाण सलीम सिंह याच्या जाचाला आणि अन्यायाला गावातील लोक कंटाळले होते. त्यामुळे त्यांनी एका रात्रीत गाव सोडण्याचा निर्णय घेतला, असं सांगितलं जातं.

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

गाव सोडताना दिला होता शाप?

असं मानलं जातं की गाव सोडताना ग्रामस्थांनी कुलधरा गावाला शाप दिला होता. यापुढे या गावात कोणीही राहू शकणार नाही, अशी मान्यता आहे. मात्र, या शापाला ऐतिहासिक पुरावा नाही.

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

आजही गाव आहे ओसाड!

सुमारे २०० वर्षांनंतरही कुलधरा गावात कायमस्वरूपी वस्ती नाही. आज हे गाव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या संरक्षणाखाली आहे. पर्यटक येथे जुन्या घरांचे अवशेष आणि गावाचा इतिहास पाहण्यासाठी येतात.

MYSTERIOUS VILLAGE IN INDIA

|

esakal

महाराष्ट्रात माणूस पहिल्यांदा कधी राहायला आला?

When Did Humans First Arrive in Maharashtra?

|

esakal

येथे क्लिक करा