Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात सध्या इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका सूरू आहे.
या मालिकेत सध्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी आहे. आता तिसरा सामना १० जुलै रोजी सुरू होणार आहे.
या मालिका सुरू असतानाच लंडनमध्ये विम्बल्डन २०२५ स्पर्धाही सुरू आहे.
त्यामुळे ७ जुलै रोजी अनेक भारत आणि इंग्लंडच्या आजी-माजी क्रिकेटपटूंनी विम्बल्डनला हजेरी लावली होती.
इंग्लंडचा जो रूट त्याच्या पत्नीसह, तर जेम्स अँडरसनही विम्बल्डनला हजर होते.
यावेळी दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररही सामना पाहायला हजर होता, त्याचीही भेट रुट आणि अँडरसनने घेतली.
भारताचा विराट कोहली देखील पत्नी अनुष्का शर्मासोबत विम्बल्डनसाठी हजर होता. त्याने नोवाक जोकोविचचा सामनाही पाहत असल्याची पोस्ट इंस्टग्रामवर केली होती.
जोकोविचनेही विराटची पोस्ट रिपोस्ट करत त्याला पाठिंबा देण्याबद्दल आभार मानले.
याशिवाय भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत देखील विम्बल्डनसाठी हजर होता.
वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा देखील टेनिसचा आनंद घेण्यासाठी आले होते.
सर्वच खेळाडू सुट घालून विम्बल्डनसाठी उपस्थित असल्याचे दिसले.