Pranali Kodre
भारताची स्टार महिला फलंदाज स्मृती मानधनाने मैदानात तिच्या फलंदाजीने चाहत्यांची मनं जिंकत असते.
तिने आत्तापर्यंत भारतीय संघालाही अनेकदा मोठे विजय मिळवून दिले आहे. ती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला संघाची कर्णधारही आहे.
गेली अनेकवर्षे स्मृती क्रिकेट खेळत असल्याने तिने तिचे फिटनेस कसा सांभाळला आहे, हे थोडक्यात जाणून घेऊ.
स्मृती तिचं रुटिन काटेकोरपणे पाळते, त्यामुळे तिला तिच्यातील ताकद सांभाळून ठेवण्यास मदत मिळते.
स्मृती शाकहारी आहे. तिच्या आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा अधिक समावेश आहे.तसेच ती घरच्या जेवणारा अधिक प्राधान्य देते.
स्मृती मोसमी भाज्यांना प्राधान्य देण्यासोबतच तिला सॅलडही आवडते. त्यामुळे तिला आवश्कय फायबर, प्रोटिन, योग्य फॅट्स अँटिऑक्सिडंट्स मिळतात. ज्यामुळे ती शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवू शकते.
स्मृती कधीकधी चिट-मीलही घेते, ज्यात सांगलीतील प्रसिद्ध भेळीचा समावेश आहे.
तसेच ती ट्रेनिंगवरही भर देते. ती सामना असला किंवा नसला तरी ती तिची ट्रेनिंग नियमित करते. त्यामुळे तिच्या स्नायुंना बळकटी मिळते आणि ती फिट राहण्यासही मदत मिळते.तिच्या ट्रेनिंगमधील धावणे हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे.
स्मृती नियमितपणे योग आणि ध्यान करते, ज्यामुळे तिची मानसिकता चांगली राहण्यात तिला मदत होते.