सूरज यादव
भारतातील बीफला जगभरातील ७० देशांमध्ये मागणी आहे. पण एक देश असा आहे जो सर्वाधिक बीफ खरेदी करतो.
भारतातून जितक्या देशांना बीफ निर्यात केलं जातं त्यात सर्वाधिक बीफ व्हिएतनाम या देशाला विकलं जातं.
२०२३ ची बीफ निर्यातीची आकडेवारी समोर आली आहे. त्यात कोणता देश किती बीफ खरेदी आणि विक्री करतो याची माहिती आहे.
व्हिएतनामच्या मीडिया रिपोर्टमध्ये बीफ खरेदीबाबत अनेक दावे करण्यात आले आहेत. यात व्हिएतनामने भारताकडून २०२३ मध्ये १.६० लाख टन बीफ खरेदी केल्याचं म्हटलंय.
जगभरात अनेक कारणांमुळे भारतीय बीफला मोठी मागणी आहे. याचा खुलासा भारत सरकारने जारी केलेल्या अहवालात केला गेलाय.
भारतीय बीफमध्ये सर्वाधिक पोषक तत्वं आहेत. हे सर्वात सुरक्षित आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थच्या निकषांनुसार योग्य आहे.
भारतीय बीफची मागणी व्हिएतनामशिवाय इंडोनेशिया, मलेशिया, इजिप्त, हाँगकाँग, इराक, सौदी अरब, फिलिपिन्स या देशात जास्त आहे.
भारतात क्वालिटी मॅनेजमेंटसोबत वर्ल्ड क्लास मीट प्रोसेसिंग इन्फ्रास्ट्रक्चर असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.