Champions Trophy स्पर्धेसाठी शिखर धवनकडे ICC ने सोपवली मोठी जबाबदारी!

Pranali Kodre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी आयसीसीने मोठी घोषणा केली आहे.

Shikhar Dhawan | Sakal

शिखर धवनकडे मोठी जबाबदारी

आयसीसीने चार खेळाडूंना या स्पर्धेचे अँबेसिडर म्हणून निवडले आहे. यामध्ये भारताच्या शिखर धवनचाही समावेश आहे.

Shikhar Dhawan | Sakal

अफलातून कामगिरी

शिखरची चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अफलातून कामगिरी झालेली आहे. त्याने २०१३ आणि २०१७ साठी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली आहे.

Shikhar Dhawan | Sakal

मालिकावीर

साल २०१३ मध्ये भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देण्यातही त्याने मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

Shikhar Dhawan | Sakal

गोल्डन बॅटचा मानकरी

तो २०१३ आणि २०१७ या दोन्ही चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्यामुळे तो दोन्ही वेळी गोल्डन बॅटचाही मानकरी ठरला होता.

Shikhar Dhawan | Sakal

धावा

त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ मध्ये ९०.७५ च्या सरासरीने ३६३ धावा केल्या होत्या. तसेच चॅम्पियन्स ट्रॉपी २०१७ मध्ये त्याने ६७.६० च्या सरासरीने ३३८ धावा केल्या होत्या.

Shikhar Dhawan | Sakal

आनंद

शिखरने चॅम्पियन्स ट्रॉफीचा अँबेसिडर झाल्याबद्दल आनंदही व्यक्त केला असून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अनेक चांगल्या आठवणी असल्याचे त्याने सांगितले.

Shikhar Dhawan | Sakal

अन्य अँबेसिडर

शिखरशिवाय पाकिस्तानचा सर्फराज अहमद, ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन आणि न्यूझीलंडचा टीम साऊदी यांनाही आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेचे अँबेसिडर म्हणून निवडले आहे.

Shikhar Dhawan | Sakal

विलियम्सनने विराटचा वेगवान ७००० धावांचा विक्रम मोडला; पाहा टॉप-५ लिस्ट

Kane williamson | Sakal
येथे क्लिक करा.