क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारे ६ भारतीय खेळाडू

Pranali Kodre

भारतीय महिला संघाचा विजय

भारतीय महिला क्रिकेट संघाने २८ जून रोजी इंग्लंडविरुद्ध नॉटिंगघमला झालेल्या टी२० सामन्यात ९७ धावांनी विजय मिळवला.

Smriti Mandhana | Sakal

स्मृती मानधनाचे शतक

या विजयात स्मृती मानधनाने शतक ठोकत इतिहास घडवला. तिने ६२ चेंडूत १५ चौकार आणि ३ षटकारांसह ११२ धावांची खेळी केली.

Smriti Mandhana | Sakal

स्मृतीने घडवला इतिहास

त्यामुळे स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात शतक करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू, तर एकूण भारताची (महिला आणि पुरुष मिळून) सहावी खेळाडू ठरली आहे.

Smriti Mandhana | Sakal

तिन्ही क्रिकेट प्रकारात शतके

स्मृतीच्या आधी ५ भारतीय पुरुष खेळाडूंनी तिन्ही क्रिकेट प्रकारात शतके करण्याचा पराक्रम केला आहे. कोण आहेत हे खेळाडू पाहा. (आकडेवारी २८ जून २०२५ पर्यंत)

Smriti Mandhana | Sakal

सुरेश रैना

सुरेश रैना भारताचा पहिला खेळाडू आहे, ज्याने तिन्ही प्रकारात शतक केले. त्याने कसोटीत १, वनडेत ५ आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १ शतक केले आहे.

Suresh Raina | Sakal

विराट कोहली

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३० कसोटी शतके, ५१ वनडे शतके, १ टी२० शतक केले आहे. त्याने एकूण ८२ शतके केली आहेत.

Virat Kohli | Sakal

रोहित शर्मा

रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ कसोटी शतके, ३२ वनडे शतके, ५ टी२० शतके केले आहेत.

Rohit Sharma | Sakal

केएल राहुल

केएल राहुलने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत ९, वनडेत ७ आणि टी२० मध्ये २ शतके केली आहेत.

KL Rahul | Sakal

शुभमन गिल

शुभमन गिलने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटीत ६ शतके, वनडेत ८ शतके आणि टी२०मध्ये १ शतक ठोकले आहे.

Shubman Gill | Sakal

Viral Video: धोनीने ज्या मित्राचा बर्थडे साजरा केला, तो नक्की आहे तरी कोण?

MS Dhoni Tennis Coach Surender Kumar | Instagram
येथे क्लिक करा.