Pranali Kodre
एमएस धोनीने आपल्या मित्राचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करतानाचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाल होता. त्यावेळी अनेकांनी धोनीच्या साधेपणाचे आणि नम्रतेचे कौतुक केलं आहे.
दरम्यान, धोनीने ज्या मित्राचा वाढदिवस साजरा केला, तो फक्त त्याचा मित्र नाही, तर माजी चॅम्पियन आहे, आंतरराष्ट्रीय पदक विजेता आहे आणि धोनीचा टेनिस प्रशिक्षकही आहे!
त्या व्यक्तीचे नाव आहे, सुरेंद्र कुमार उर्फ 'काका'. ते JSCA टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक आहेत.
सुरेंद्र कुमार यांचा जन्म टाटानगर, जमशेदपूरचा असून ते बिहारकडून राष्ट्रीय टेनिस स्पर्धा खेळले. तसेच त्यांनी ज्युनियर लेव्हलला भारताचे प्रतिनिधित्वही केले.
मिडिया रिपोर्ट्सनुसार १९७९ साली ते भारताचे अव्वल क्रमांकाचे ज्युनिअर टेनिसपटू होते. त्याआधी त्यांनी १९७७ मध्ये थायलंडला झालेल्या आशियाई स्पर्धेत पदकही जिंकले होते.
त्यांना बॉब ब्रेट यांच्याकडूनही मार्गदर्शन मिळालं, ब्रेट हे बोरिस बेकरसारख्या जागतिक दिग्गजांचेही प्रशिक्षक होते.
काकांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. ते ICI स्पोर्ट्स क्लबवर लिअँडर पेसविरुद्ध एक प्रदर्शन सामनाही खेळले होते!
ते सध्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून धोनीलाही टेनिसमध्ये मार्गदर्शन करतात.