Pranali Kodre
नुकताच मुंबईतील छ. शिवाजी पार्क दादर येथे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सरांच्या स्मारकाचा अनावरण सोहळा पार पडला.
यावेळी माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची अवस्था पाहाता, सर्वांनीच हळहळ व्यक्त केली.
एकेकाळी कोट्यवधि रुपये कमाणारा विनोद कांबळी सध्या अनेक आजारांशी झुंज देतोय.
विनोद कांबळीने १९९१ मध्ये भारतासाठी पदार्पण केले आणि १०४ वन डे व १७ कसोटी सामने खेळले. पण त्याला गुणवत्ता असूनही अनेक कारणांनी भारतीय संघातील जागा नंतर टिकवता आली नाही.
अनेक मिडिया रिपोर्ट्सनुसार पूर्वी कोट्यवधि रुपये कमाणाऱ्या विनोद कांबळीला आता बीसीसीआयच्या पेन्शनवर अवलंबून रहावं लागत आहे.
त्याला बीसीसीआयकडून दर महिन्याला ३० हजार रुपये मिळतात. त्याची वर्षाची साधारण कमाई ४ लाखाच्या आसपास आहे.
कांबळीच्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं, तर त्यान सचिनप्रमाणेच शारदाश्रम शाळेत शिक्षण घेतलं. याच शाळेत त्याची आणि सचिनची मैत्री बहरली होती.
अनेक रिपोर्ट्सनुसार विनोद कांबळीचे शिक्षण १० वी पर्यंतच झालं आहे.