Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी २०२४-२५ ही ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे.
या मालिकेतील दुसरा सामना ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना आहे.
दरम्यान, ऍडलेड ओव्हल या मैदानात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची कामगिरी शानदार राहिली आहे.
त्याने या मैदानात आत्तापर्यंत ७ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ७२.१० च्या सरासरीने ७२१ धावा केल्या आहेत.
त्याने ४ शतके आणि २ अर्धशतके या मैदानात झळकावली आहेत.
दरम्यान या मैदानात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये विराटच्या पुढे फक्त सर विव रिचर्ड्स आहेत. त्यांनी ९ सामन्यात ७४६ धावा केल्या आहेत.
विराटने ७ सामन्यातील ४ कसोटी सामने या मैदानात खेळले असून यात त्याने ३ शतके केली आहेत.
विराटने कसोटीमध्ये ऍडलेड ओव्हल मैदानात ८ डावात ५०९ धावा केल्या आहेत.
तो या मैदानात कसोटीत ५०० धावा करणारा ब्रायन लारा, हॉब्स आणि रिचर्ड्स यांच्यानंतरचा चौथाच परदेशी खेळाडू आहे. तसेच एकमेव भारतीय खेळाडू आहे.