Pranali Kodre
क्रिकेटमध्ये विराट कोहली, एमएस धोनी, सचिन तेंडुलकर हे मोठे ब्रँड्स जरी समजले जात असले, तरी ते सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू नाही.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे आर्यमान बिर्ला. सध्या २७ वर्षांचा असलेल्या आर्यमनने वयाच्या 22 व्या वर्षीच निवृत्ती घेतली होती.
आर्यमान तो उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांचा मुलगा आहे. त्याच्याकडे 70 हजार कोटींची संपत्ती आहे.
त्यानं आता बिझनेसवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
२०२३ मध्ये आर्यमनची आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये आदित्य बिर्ला फॅशन अँड रिटेल लिमिटेडमध्ये डिरेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तो आता बिझनेसमध्ये वस्त आहे.
बिझनेसमध्ये लक्ष घालण्यापूर्वी आर्यमन क्रिकेटमध्ये सक्रिय होता. पण तो अद्याप IPL आणि भारतीय संघाकडून खेळलेला नाही.
पण तो रणजी खेळला असून त्याच्या नावावर फर्स्ट क्लास सेंच्युरीही आहे. त्यानं रणजीमध्ये मध्य प्रदेशकडून 2017 मध्ये पदार्पण केलं होतं.
त्यानं ९ फर्स्ट क्लास अन् ४ लिस्ट ए सामने खेळलेत. त्यानं साडेचारशे धावा केल्यात. तो २०१९ मध्ये अखेरचा प्रोफेशनल सामना खेळला होता.