हत्तीने लावला भारतातल्या कच्च्या तेलाचा शोध

संतोष कानडे

तेल

भारत इतर देशांमधून ८० ते ८५ टक्के तेल आयात करतो. मात्र उर्वरित तेल भारतामध्ये तयार होतं.

आसाम

भारतामध्ये सगळ्यात आधी आसाममधल्या माकूम येथे रेल्वेच्या कामादरम्यान हत्तीच्या पायाला तेल चिटकलेलं दिसलं.

आशियातली पहिली विहीर

तिथे खोदकाम केल्यानंतर आशियातली पहिली तेल विहीर सापडली. मात्र प्रत्यक्षात १८८९ मध्ये आसाममधीलच डिग्बोई येथे पहिली व्यावसायिक तेल विहीर खोदण्यात आली.

डिग्बोई

१९०१ मध्ये डिग्बोई येथे भारताची पहिली ऑई रिफायनरी सुरु झाली. हा प्लांट आजही कार्यान्वित आहे.

अंकलेश्वर

१९६० मध्ये गुजरातल्या अंकलेश्वर, कलोल येथे तेलाचे साठे सापडले.

मुंबई हाय

पुढे १९७४ मध्ये मुंबई हाय येथे अरबी समुद्रात तेलाचा साठा सापडला. एकूण स्वदेशी तेल उत्पादनात याचा वाटा सर्वाधिक आहे.

राजस्थान

राजस्थानच्या बारमेर येथेही अलिकडेच तेलसाठे सापडले आहेत. भारतात तेल क्षेत्रामध्ये, ओएनजीसी, ऑईल इंडिया लिमिटेड, केर्न इंडिया या कंपन्या काम करतात.

इराण

भारत एकूण गरजेच्या केवळ १५-२० टक्के तेल तयार करतो. उर्वरित तेल इराक, इराण, सौदी अरेबिया, रशिया येथून आयात करावं लागतं.

तेल ग्राहक देश

भारत हा जगातल्या सर्वात मोठा तेल ग्राहक देश आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर तेलाचे भाव वाढले की देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो.

भूगर्भात कच्चं तेल कसं तयार होतं? इंटरेस्टिंग माहिती

<strong>येथे क्लिक करा</strong>