Shubham Banubakode
आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील स्वर्णगिरी येथे भारतातील पहिल्या खाजगी सोन्याच्या खाणीतून व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात झाली.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकल्पाचे उद्घाटन केले. स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली ही देशातील पहिली खाजगी सोन्याची खाण ठरली आहे.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
या प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य सरकारने उद्घाटनापूर्वीच जोन्नागिरी गावाचे नाव बदलून ‘स्वर्णगिरी’ असे अधिकृतपणे ठेवले.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
जिओमायसोरे सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने सुमारे ४०५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ५९८ हेक्टर परिसरात हा प्रकल्प उभारला आहे.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
या खाण प्रकल्पामुळे सुमारे ७०० जणांना थेट रोजगार मिळणार आहे. विशेष म्हणजे, यातील ८० टक्के रोजगार स्थानिक नागरिकांना दिला जाणार आहे.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये सुमारे ४०० किलो सोन्याचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. भविष्यात हे उत्पादन दरवर्षी १ टनापर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
दुसऱ्या प्रोसेसिंग युनिटच्या उभारणीनंतर खाणीची उत्पादन क्षमता वार्षिक २ टनांपर्यंत पोहोचू शकते. यामुळे राज्याच्या महसुलातही मोठी भर पडणार आहे.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
आंध्र प्रदेशातील इतर भागांतही सोन्याचे साठे शोधले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, स्वर्णगिरी प्रकल्पामुळे आधुनिक आणि शाश्वत खाणकामाला नवी दिशा मिळणार आहे.
India's First Private Gold Mine Begins Production at Swarnagiri
esakal
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal