Shubham Banubakode
लोणावळ्याजवळ सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेला लोहगड इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा सुंदर संगम आहे. १,०३३ मीटर उंचीवरील हा गड पर्यटकांना आकर्षित करतो.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड आपल्या ताब्यात घेतला. स्वराज्याच्या विस्तारात आणि संरक्षणात या किल्ल्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा हे लोहगडचे चार भव्य प्रवेशद्वार आजही इतिहासाची साक्ष देतात. मजबूत बांधकामामुळे हा दुर्गशास्त्राचा उत्कृष्ट नमुना आहे.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
किल्ल्याचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे ‘विंचूकडा’. विंचवाच्या नांगीसारखा दिसणारा हा सुळका पर्यटक आणि छायाचित्रकारांसाठी खास आकर्षण ठरतो.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
लोहगड किल्ल्याचा इतिहास तेराव्या शतकापासून सुरू होतो. आदिलशाही, मुघल आणि मराठ्यांचा अंमल पाहिलेल्या या किल्ल्याने अनेक युद्धे अनुभवली.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
मळवली रेल्वे स्थानकापासून सुरू होणारा लोहगडचा ट्रेक सोपा आणि रोमांचक आहे. हिरवीगार वाट, थंडगार वारे आणि निसर्गरम्य दृश्ये प्रवास संस्मरणीय बनवतात.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
जून ते सप्टेंबर दरम्यान लोहगड हिरवाईने नटतो. धुक्याने वेढलेले बुरुज, वाहते धबधबे आणि ढगांमध्ये हरवलेला गड पाहणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
लोहगडसोबतच विसापूर किल्ला, भाजे लेणी आणि कार्ला लेणी यांनाही भेट देता येते. त्यामुळे एकाच ट्रिपमध्ये इतिहास आणि निसर्गाचा दुहेरी आनंद मिळतो.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
लोहगड मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर आणि पुण्यापासून ६० किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेने लोणावळ्या पर्यंत जाता येते.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
इतिहासाची ओढ, ट्रेकिंगची आवड किंवा निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल, तर लोहगड हा सर्वोत्तम पर्याय आहे.
Lohagad Fort Monsoon Travel Guide
esakal
800-year-old-historic-stepwell
esakal