India First Red Road: भारतातील पहिला ‘रेड रोड’ कसा वाचवतो वन्यजीव?

Monika Shinde

जबलपूर–भोपाळ

भारतात वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. जबलपूर–भोपाळ महामार्गावर देशातील पहिला ‘रेड रोड’ तयार करण्यात आला आहे.

What Is India’s First Red Road

|

Esakal

रेड रोड म्हणजे काय?

रेड रोड म्हणजे रस्त्यावर टाकलेला खास लाल रंगाचा थर. हा थर सामान्य रस्त्यापेक्षा वेगळा असल्याने वाहनचालक लगेच सावध होतो.

What Is India’s First Red Road

|

Esakal

कुठे तयार झाला आहे?

हा रेड रोड मध्यप्रदेशातील राणी दुर्गावती टायगर रिझर्व परिसरात तयार करण्यात आला आहे. हा भाग वन्यप्राण्यांच्या सतत हालचालींसाठी ओळखला जातो.

What Is India’s First Red Road

|

Esakal

वेग कसा कमी होतो?

रेड रोडवर ‘टेबल-टॉप मार्किंग’ असल्यामुळे वाहन चालवताना हलके झटके जाणवतात. त्यामुळे चालक आपोआप वाहनाचा वेग कमी करतो.

What Is India’s First Red Road

|

Esakal

अपघात कसे टळतात?

वेग कमी झाल्यामुळे अचानक रस्ता ओलांडणाऱ्या प्राण्यांना धडक बसण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि अनेक जीव वाचतात.

What Is India’s First Red Road

|

Esakal

लाल रंगाचे महत्त्व

लाल रंग धोक्याचा संकेत मानला जातो. दूरवरूनच लाल रस्ता दिसल्यामुळे चालकाला आपण जंगल क्षेत्रात आहोत, याची जाणीव होते.

What Is India’s First Red Road

|

Esakal

इतर सुरक्षा उपाय

या महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी अंडरपास बांधण्यात आले आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उंच लोखंडी कुंपण लावण्यात आले आहे.

What Is India’s First Red Road

|

Esakal

Face Wash Tips: फेसवॉश खरेदी करताना 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा!

येथे क्लिक करा