Pranali Kodre
भारतीय हॉकी पुरुष संघाचा फॉरवर्ड खेळाडू मनदीप सिंग आणि महिला संघाची डिफेंडर उदिता दुहान लग्नबंधनात अडकणार आहे.
भारताच्या हॉकी संघातील दोघेही प्रमुख खेळाडूंपैकी एक आहेत. ते २१ मार्च रोजी जलंधरमध्ये लग्न करणार आहेत.
२०१८ मध्ये हे दोघे भारताच्या राष्ट्रीय शिबिरात बंगळुरूमध्ये पहिल्यांदा भेटले होते. त्यावेळी फक्त त्यांची चांगली ओळख होती. पण नंतर चांगली मैत्री झाली.
रिपोर्ट्सनुसार कोरोनाकाळात लॉकडाऊन असताना दोघेही एकाच शिबिरात कुटुंबापासून लांब अडकले.
त्यावेळी बराच वेळ एकत्र त्यांना मिळाल्याने त्यांच्यातील मैत्री आणखी बहरली.
हळुहळू त्यांच्यातील मैत्रीचे त्यावेळी प्रेमात रुपांतर झालं आणि आता ते एकमेकांशी लग्न करण्यास सज्ज आहेत.
त्यांच्या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. या लग्नसोहळ्यासाठी त्यांचे कुटुंबिय, संघसहकारी आणि मित्रपरिवार उपस्थित आहे.