Pranali Kodre
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता आयपीएल २०२५ स्पर्धा खेळताना दिसणार आहे.
रोहितला १६.३० कोटी रुपयांना मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ साठी रिटेन केले आहे.
रोहित शर्माने आयपीएलपूर्वी नुकतीच कर्णधार म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा जिंकली आहे.
त्यानंतर रोहित आयपीएलसाठी मुंबईत सामील होण्यापूर्वी कुटुंबासमवेत सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसला.
तो त्याची पत्नी आणि मुलांसह मालदीवला फिरण्यासाठी गेला होता.
त्याने सुट्ट्यांची मजा घेतानाचा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यात रोहित सायकल चालवताना दिसतोय. तसेच तो त्याची मुलगी समायरासोबत मजामस्ती करतानाही दिसत आहे.
दरम्यान, रोहित या सुट्ट्यांनंतर मुंबईत परतला आहे. तो आता २२ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे.