सुपर एल निनो म्हणजे काय? भारतातील पाऊस आणि तापमानावर काय होईल परिणाम?

Vinod Dengale

सुपर एल निनो

प्रमुख हवामान संस्था NOAAच्या अंदाजानुसार मे-जून 2026 दरम्यान एल निनो सक्रिय होण्याची शक्यता तब्बल 82% आहे. तज्ज्ञांच्या मते यावेळी हा 'सुपर एल निनो' बनू शकतो.

सामान्य परिस्थिती

पॅसिफिक महासागराच्या पूर्व भागात म्हणजे दक्षिण अमेरिकेजवळील पाणी तुलनेने थंड असतं, तर पश्चिम भागात म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि आशियाजवळील पाणी अधिक गरम असतं.

चांगला पाऊस

अशावेळी व्यापारी वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. हे वारे गरम पाणी आशियाकडे ढकलतात. त्यामुळे भारत आणि आसपासच्या भागात चांगला पाऊस पडतो आणि हवामान संतुलित राहतं.

एल निनो म्हणजे काय?

एल निनो हा पॅसिफिक महासागराशी संबंधित नैसर्गिक हवामान बदल आहे. यामध्ये महासागरातील पाण्याचे तापमान अचानक वाढू लागतं.

काय होत?

यानंतर गरम पाणी आशियाकडे जाण्याऐवजी पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागात पसरतं. त्यामुळे व्यापारी वारे कमजोर होतात आणि भारतातील मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता वाढते.

एल निनो परिणाम

यामुळे पावसाचं पॅटर्न बदलतं. काही भागांत अतिवृष्टी आणि पूर, तर काही भागांत दुष्काळ आणि तीव्र उष्णतेच्या लाटा म्हणजेच हीटवेव अनुभवतात.

सुपर एल निनो काय?

जेव्हा समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा सुमारे 2°C किंवा त्याहून अधिक वाढतं, तेव्हा त्या स्थितीला “सुपर एल निनो” म्हटलं जातं.

सुपर एल निनोचा परिणाम

पॅसिफिक महासागर पृथ्वीच्या जवळपास 32% भाग व्यापतो. त्यामुळे या महासागरातील पाणी जास्त गरम झालं की वातावरणातील उष्णता वाढते.

हवामानावर परिणाम

यामुळे वाऱ्यांची दिशा बदलते, पावसाचे ढग दुसरीकडे सरकतात आणि शेवटी जगभरातील हवामानावर परिणाम होतो.

भारतावर परिणाम

भारतीय मान्सूनचं थेट संबंध पॅसिफिक महासागरातील हवामानाशी असतो. त्यामुळे सुपर एल निनोच्या काळात मान्सून वारे कमजोर होऊ शकतात.

कमी पाऊस

यामुळे मे-जूनमध्ये तापमान अधिक वाढण्याची आणि सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वाढू शकते.

महाराष्ट्रावर मोठा परिणाम

पाऊस कमी पडल्यास राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित होऊ शकतात.

मराठमोळ्या तरुणाने स्थापन केलेल्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चा जाहीरनामा व्हायरल!

Cockroach Janta Party’ Manifesto Goes Viral Across Social Media

|

eSakal

हेही वाचा