Yashwant Kshirsagar
भारतात दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा होतो. मात्र बिहारमधील बक्सर जिल्ह्यातील डुमरांव येथे हा दिवस १६ ऑगस्ट रोजी देखील तितक्याच उत्साहाने साजरा केला जातो.
Dumraon Independence Day
esakal
ही परंपरा १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनादरम्यान देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या चार शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाशी निगडीत आहे.
Dumraon Independence Day
esakal
महात्मा गांधींनी दिलेल्या ‘करा किंवा मरा’ या हाकेने देशभर आंदोलन तीव्र झाले. डुमरांवमधील हजारो लोकांनी तिरंगा घेऊन पोलीस ठाण्याकडे कूच केली.
Dumraon Independence Day
esakal
ब्रिटिश प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या इमारतीवर राष्ट्रध्वज फडकवून स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणे हा आंदोलकांचा उद्देश होता. महिला, तरुण आणि मुलांनीही यात सक्रिय सहभाग घेतला.
Dumraon Independence Day
esakal
आंदोलक माघार घेण्यास तयार नसल्याने ब्रिटिश पोलिसांनी गोळीबार केला. यात कपिल मुनी, गोपाल कहार, रामदास सोनार आणि रामदास लोहार हे हुतात्मा झाले.
Dumraon Independence Day
esakal
अनेक जण जखमी झाले तरी लोकांचा निर्धार डगमगला नाही. सहकाऱ्यांचे बलिदान होऊनही आंदोलन सुरू राहिले आणि अखेरीस तिरंगा फडकवून संकल्प पूर्ण झाला.
Dumraon Independence Day
esakal
स्वातंत्र्यानंतर ज्या पोलीस ठाण्यावर ही घटना घडली, त्याचे रूपांतर चार हुतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारकात करण्यात आले. आजही हे स्मारक त्या बलिदानाची आठवण करून देते.
Dumraon Independence Day
esakal
दरवर्षी १६ ऑगस्ट रोजी येथे मोठ्या संख्येने लोक जमून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहतात, राष्ट्रध्वज फडकवतात आणि त्यांच्या योगदानाचा गौरव करतात.
Dumraon Independence Day
esakal
कालांतराने या परंपरेला अधिकृत मान्यता मिळाली. २०१५ मध्ये बिहार सरकारने १६ ऑगस्ट रोजीच्या कार्यक्रमास अधिकृत दर्जा दिला.
Dumraon Independence Day
esakal
२०१७ मध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हुतात्मा स्मारकापाशी त्या चार वीरांच्या पुतळ्यांचे अनावरण केले, जेणेकरून भावी पिढ्याही त्यांच्या बलिदानाची आठवण ठेवतील.
Dumraon Independence Day
esakal
Black Rice Health Benefits
esakal