समुद्रात भारताची अण्वस्त्रे सज्ज; पाकिस्तानची उडाली झोप!

विनयन वाघमारे

समुद्रात हालचाल, इस्लामाबाद हादरले!

भारतीय नौदलाने समुद्रात अशी रणनीतिक चाल खेळली आहे, ज्यामुळे थेट इस्लामाबाद आणि रावळपिंडीतील लष्करी मुख्यालयात घबराट पसरली आहे.

Submarine

|

Sakal

अणू पाणबुड्यांवर क्षेपणास्त्रांची तैनाती

भारताने अरिहंत श्रेणीतील अत्याधुनिक अणू पाणबुड्यांवर अण्वस्त्रसज्ज सबमरीन-लाँचड् बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची (SLBM) गुप्त तैनाती अधिक मजबूत केली आहे.

Submarine

|

sakal

'न्यूक्लियर ट्रायड' झाले अभेद्य

जमीन, आकाश आणि समुद्र या तिन्ही आघाड्यांवरून अण्वस्त्रे डागण्याची क्षमता (Nuclear Triad) भारताने आता पूर्णपणे अचूक आणि अभेद्य केली आहे.

Submarine

|

sakal

'सेकंड स्ट्राईक' क्षमता रोखणे अशक्य!

समुद्राच्या शेकडो फूट खोलीत शांतपणे दबा धरून बसणाऱ्या या पाणबुड्यांचा ठावठिकाणा शोधणे किंवा त्यांचा पलटवार (Second-strike capability) रोखणे पाकच्या रडारला अशक्य आहे.

Submarine

|

sakal

पाकिस्तानी जनरल्सची उडाली झोप

भारताची ही वाढती ताकद पाहून पाकिस्तानच्या 'नॅशनल कमांड ऑथॉरिटी'च्या (NCA) गोटात तीव्र चिंता असून, लष्कराच्या हतबलतेतून युद्धाची भाषा सुरू झाली आहे.

Submarine

|

sakal

पाकिस्तानची थेट युद्धाची धमकी

"आम्हीही शांत बसणार नाही, सामरिक तोल राखण्यासाठी प्रति-अण्वस्त्रे तैनात करू," अशी धमकी देत पाकिस्तानने मोठ्या संघर्षाचा बागुलबुवा उभा केला आहे.

Submarine

|

sakal

अंतर्गत अराजकावरून लक्ष हटवण्याचा प्रयत्न

देशातील महागाई, दिवाळखोरी आणि राजकीय अस्थिरतेवरून स्वतःच्या जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच पाकिस्तान अण्वस्त्र युद्धाची भीती दाखवत असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.

Submarine

|

sakal

भारताचे सागरी वर्चस्व कायम!

भारताचे धोरण नेहमीच 'नो फर्स्ट युझ'चे राहिले आहे; मात्र शत्रूला जरब बसवणारे हे अण्वस्त्र कवच पाकिस्तानच्या धमक्यांना पुरून उरणारे आहे.

Submarine

|

sakal

आयफोन ड्युओचा स्क्रीन फुटला? रिपेअरिंगचा खर्च ऐकून धक्का बसेल!

Iphone

|

Sakal

Click here!