Saisimran Ghashi
परवा रात्री पाकिस्तानने भारताच्या पश्चिम सीमेवर तुफानी मिसाइल व ड्रोन हल्ला केला पण तो यशस्वी ठरला नाही
भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने काही सेकंदात साऱ्या मिसाइल्स रोखल्या. ना सैन्य तळावर ना नागरी वस्त्यांवर हल्ला झाला
रशियन बनावटीचा S-400 ट्रायम्फ ज्याला ‘सुदर्शन चक्र’ म्हटलं जातं याने शेकडो जीव वाचवले, कोट्यवधींची मालमत्ता सुरक्षित ठेवली.
ज्याने ही प्रणाली वेळेत आणली तो नेता म्हणजे मनोहर पर्रिकर. विरोध सहन करत देशहिताचा निर्णय घेतला.
स्वातंत्र्य काळातील जीप खरेदी ते बोफोर्स अगस्ता हेलिकॉप्टर खरेदीपर्यंत आजवर आपल्या देशात भ्रष्टाचारानेच इतिहास भरलेला आहे.
IIT पास, संघ स्वयंसेवक, गोव्याचे माजी मुख्यमंत्री असलेल्या पर्रिकरांनी संरक्षण मंत्रालयात पारदर्शकतेचं वारे आणलं.
त्यांनी मध्यम आणि छोट्या पल्ल्याच्या 100-100 युनिट्सच्या खरेदी ऐवजी S-400 वर भर दिला, यामुळे 49,300 कोटींची बचत झाली.
गोवा ब्रिक्समध्ये भारत-रशिया करार, 2018 मध्ये MOU, 2021 मध्ये S-400 तैनात झाले, ही पर्रिकरांची दूरदृष्टी होती.
आज मनोहर पर्रिकर आपल्यात नसले तरी झपाट्याने निर्णय घेणारा, सैनिकांचा खरा साथी ही त्यांची ओळख कधीच कोणी विसरणार नाही.