15 गोळ्या छातीत झेलून टायगर हिलवर तिरंगा फडकणारा परमवीर, कारगिलच्या हिरोची कहाणी

Saisimran Ghashi

16व्या वर्षी लष्करात भरती

योगेंद्र सिंह यादव यांचे वडीलसुद्धा लष्करात होते. अवघ्या 16व्या वर्षी ते भारतीय लष्करात दाखल झाले.

esakal

देशासाठी शौर्यगाथेची सुरुवात

योगेंद्र यादव यांना 1999 मध्ये कारगिल युद्धादरम्यान टायगर हिलवरील शत्रूंचे बंकर मुक्त करण्याचे महत्त्वाचे काम दिले गेले.

esakal

जीवघेणी चढाई

टायगर हिलची चढाई अत्यंत कठीण होती. जवळजवळ 90 अंश कोनात ती चढावी लागत होती. यादव आणि त्यांच्या कमांडो पथकाने अडथळे पार केले.

esakal

पाकिस्तानी गोळीबाराला प्रत्युत्तर

चढाईदरम्यान पाक सैनिकांनी जोरदार गोळीबार केला. अनेक जवान जखमी झाले. परंतु यादव आणि त्यांचे सहकारी पुढे सरकले.

esakal

रणनीतीचा भाग

भारतीय लष्कराने काही जवानांना मागे हटण्याचा आदेश दिला. प्रत्यक्षात यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठिकाणी गुप्तपणे मुक्काम केला.

esakal

अचानक हल्ला आणि उधळले पाक सैनिक

पाक सैनिक खात्रीसाठी खाली आले असता यादव यांच्या पथकाने अचानक हल्ला चढवला. अनेक पाक सैनिक ठार झाले, काही वर पळून गेले.

esakal

टायगर हिल जवळ, पण धोका कायम

भारतीय जवान टायगर हिलजवळ पोहोचले. मात्र पुन्हा पाकिस्तानी लष्कराने चारही बाजूंनी घेराव घातला आणि जोरदार हल्ला चढवला.

esakal

15 गोळ्या लागल्या तरी लढा दिला

योगेंद्र यादव यांच्या शरीरात 15 गोळ्या घुसल्या. तरीही त्यांनी ग्रेनेड फेकले, रायफल उचलून उरलेले शत्रू मारले आणि शेवटी बेशुद्ध होऊन एका नाल्यात पडले.

esakal

मृत्यूला हरवले, भारताला विजय मिळवून दिला

भारतीय जवानांनी त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या जीवाचे रक्षण झाले. त्यांच्या शौर्यामुळे टायगर हिलवर भारताने विजय मिळवला.

esakal

परमवीर चक्राचा सन्मान

शौर्य आणि बलिदानासाठी योगेंद्र सिंह यादव यांना सर्वोच्च सैनिकी सन्मान परमवीर चक्र प्रदान करण्यात आला.

esakal

पाकिस्तान 1960-70 दरम्यान कसे होते? 10 फोटो पाहून वाटेल आश्चर्य

pakistan major cities old photos | esakal
येथे क्लिक करा