संतोष कानडे
भारतात अनेक उद्योगपती, सेलिब्रिटी आणि राजकीय लोकांकडे स्वतःच्या मालकीची खासगी विमानं आहेत. सर्व खासगी विमानांची संख्या ५०० पेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं.
यामध्ये मुकेश अंबानी, गौतम अदानींचा समावेश होतो. अंबानींकडे १००० कोटी रुपयांचे Boeing 737 MAX 9 विमान आहे.
तर गौतम अदानींकडे Boeing 737 MAX 8 हे भलंमोठं विमान आहे. याचीही किंमत हजार कोटींच्या घरात असल्याचं सांगितलं जातं.
यांसह सायरस आणि अदर पूनावाला यांची Poonawalla Aviation नावाची कंपनी आहे. त्यांच्याकडे विमानासह हेलिकॉप्टर आहे.
टाटा, बिर्ला, मित्तल, जिंदाल, गोएंका या उद्योगपतींकडे महागडी प्रायव्हेट जेट्स आहेत.
सेलिब्रिटींचा विचार केला तर अमिताभ बच्चन यांच्याकडे Bombardier Challenger 300 विमान आहे.
अक्षय कुमार, शाहरुख खान, अजय देवगण, प्रियांका चोप्रा, शिल्पा शेट्टी, हृतिक रोशन, अल्लू अर्जुन, राम चरण, रजनिकांत यांच्याकडे स्वतःची विमानं आहेत.
खासगी विमानांची किंमत ५०० कोटींपासून १००० कोटी आणि त्याहीपेक्षा जास्त असते. अशा विमानांमध्ये अनेक सोयी-सुविधा असतात.