Pranali Kodre
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची ११ जानेवारी रोजी निवड करण्यात आली.
या मालिकेतून सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मोहम्मद शमीचे वर्षभरानंतर पुनरागमन होणार आहे. त्याचीही संघात निवड झाली आहे.
२२ जानेवारी ते २ फेब्रुवारीदरम्यान या मालिकेतील सामने कोलकाता, चेन्नई, राजकोट, पुणे आणि मुंबईत होणार आहेत.
या मालिकेसाठी सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून कायम असला, तरी उपकर्णधार म्हणून अक्षर पटेलकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
दरम्यान, या टी२० संघात अनेक बदलही केले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी भारताने अखेरची टी२० मालिका नोव्हेंबर २०२४ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या भारतीय संघातील तब्बल ५ खेळाडूंना इंग्लंड विरूद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या रमणदीप सिंग, जितेश शर्मा, विजयकुमार वैशाख, यश दयाल आणि आवेश खान या पाच खेळाडूंना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी निवडण्यात आलेलं नाही.
त्यांच्याऐवजी नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, मोहम्मद शमी, ध्रुव जुरेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांना इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळाली आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल