Pranali Kodre
सार्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ स्पर्धेसाठी मेलबर्नमध्ये आहे.
जोकोविचला पहिल्या फेरीत निशेष बसवारेड्डीविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना १३ जानेवारीला होणार आहे.
त्यापूर्वी जोकोविचने बिग बॅश लीगमधील मेलबर्नला झालेल्या मेलबर्न स्टार्स विरुद्ध मेलबर्न रेनेगेड्स सामन्याला हजेरी लावली होती.
त्याचा हा सामना पाहातानाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्याच्यासोबत त्याचा मुलगाही सामन्यासाठी आला होता.
यावेळी तो फलंदाजांची फटकेबाजी पाहून आश्चर्यचकीतही झाल्याचे पाहायला मिळाले.
या सामन्यात मार्कस स्टॉयनिस कर्णधार असलेल्या मेलबर्न स्टार्सने ४२ धावांनी विजय मिळवला. मॅक्सवेलने ९० धावांची खेळी केली.
दरम्यान, जोकोविच यंदा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे.
जोकोविचने आत्तापर्यंत २४ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत.