Pranali Kodre
भारताचा वनडे आणि कसोटी कर्णधार शुभमन गिलने नुकताच ८ सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा केला. त्याने अनेक विक्रम आत्तापर्यंत केले आहेत.
Shubman Gill World Record
Sakal
शुभमन गिलने १९ डावात १०००, ३८ डावात २००० आणि ६२ डावात ३००० धावा वनडे धावा केल्या आहेत. त्यामुळे तो सर्वात जलद १०००, २००० आणि ३००० वनडे धावा करणारा भारतीय आहे.
Shubman Gill World Record
Sakal
गिलने न्यूझीलंडविरुद्ध जानेवारी २०२३ मध्ये २३ वर्षे १३२ दिवस वय असताना १४९ चेंडूत २०८ धावांची खेळी केली. त्यामुळे तो वनडेत द्विशतक करणारा सर्वात युवा खेळाडू आहे.
Shubman Gill World Record
Sakal
गिल आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात ४००० धावा करणारा खेळाडू आहे, त्याने २०२६ हंगामात २६ वर्षे २१६ दिवस इतके वय असताना हा टप्पा गाठला होता.
Shubman Gill World Record
Sakal
गिलने इंग्लंडविरुद्ध एजबस्टन कसोटीत २०२५ मध्ये २६९ आणि १६१ धावांची खेळी केली होती. त्यामुळे तो एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक ४३० धावा करणारा भारतीय आहे.
Shubman Gill World Record
Sakal
याच एजबस्टन कसोटीत भारताने इंग्लंडला ३३६ धावांनी पराभूत केले होते. त्यामुळे गिल परदेशात धावांच्या तुलनेत सर्वात मोठा विजय मिळवणारा भारतीय कर्णधार ठरला होता.
Shubman Gill World Record
Sakal
गिलने २०२५ मध्ये इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेत ४ शतके केली होती. त्यामुळे तो कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटी मालिकेत ४ शतके करणारा पहिला खेळाडू ठरला.
Shubman Gill World Record
Sakal
गिल हा तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सर्वाधिक धावा ३६० धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. त्याने २०२३ मध्ये मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध ३६० धावा केल्या होत्या.
Shubman Gill World Record
Sakal
Oldest Cricket Grounds
Sakal