Pranali Kodre
सापशिडी हा खेळ जगभरातील मुलांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. घरात बसून हा खेळ खेळता येतो. तसेच अनेक देशांमध्ये तो विविध रूपांमध्ये खेळला जातो.
पण या खेळाचा शोध कुठे आणि कधी लागला हे माहित आहे का? तर त्याबद्दलच थोडक्यात जाणून घेऊ.
सापशिडी या खेळाचा शोध भारतात लागला, याला मोक्षपट किंवा मोक्षपटमू असे नाव होते. हा खेळ साधारणत: इ.स.पू. दुसऱ्या शतकात खेळला जात होता, असे मानले जाते.
काही इतिहासकारांच्या मते १३व्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी हा खेळ तयार केला होता.
प्रत्येक चौरस एखादे सद्गुण किंवा दुर्गुण दर्शवत असे.साप दुर्गुणांचे आणि शिडी सद्गुणांचे प्रतिक होते. त्यामुळे यातून मुलांना नैतिक गोष्टी शिकता येतात.
या खेळात शेवटच्या चौरसावर पोहोचणे म्हणजे मोक्ष प्राप्ती. जीवनातील चढ-उतारांमधून शिकत, योग्य मार्गाने पुढे जात मोक्ष साध्य करणे हे यामागचे उद्दिष्ट होते, हे म्हटले जाते.
१९व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटिश व्यापाऱ्यांनी हा खेळ इंग्लंडला नेला. तेथे त्यात काही बदल करून 'Snakes and Ladders' नाव देण्यात आले.
अमेरिकेत हा खेळ Chutes and Ladders या नावानेही ओळखला जातो.
आता हा खेळ केवळ मनोरंजनाचे साधन बनले असून त्यात आता साप-शिड्यांचे प्रमाणही समान करण्यात आले. आता तर या खेळाचे डिजिटल रूपही पाहायला मिळते.