संतोष कानडे
लडाखमध्ये असलेला हा मठ अत्यंत दुर्गम आहे. गुहेच्या तोंडावर, डोंगरकड्याला चिटकून हा मठ बांधलेला आहे.
येथे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाहीये. कित्येक तास पायपीट करावी लागते. त्यामुळे लोक जाण्यासाठी घाबरतात.
आंध्र प्रदेशात असलेल्या या ठिकाणाला भारताचं ग्रँड कन्यन म्हटलं जातं. पेन्नार नदीने व्यापलेला हा परिसर आहे.
लाल दगड आणि त्यातून वाहणारी नदी.. इथला सूर्यास्त पाहून तर तुम्ही स्वतःला विसरुन जाल.
त्रिपुरा राज्यात असलेलं हे ठिकाण असून जंगलामध्ये डोंगररांगात कातळावर देवांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत.
या मूर्ती कधी आणि कोणी कोरल्या याचे रहस्य आजही कायम आहे. लोककथांनुसार भगवान शिव येथे देवतांसोबत मुक्कामी होते.
तमिनाडूमध्ये हे ठिकाण आहे. हे भूतांचं शहर म्हणून ओळकलं जातं. १९६४ च्या चक्रीवादळामध्ये हे शहर उद्ध्वस्त झालं होतं.
राम सेतूचे अवशेष इथूनच सुरु होतात, असं मानलं जातं. समुद्राच्या मधोमध चर्च आणि रेल्वे स्टेशनचे अवशेष दिसतात.
जम्मू काश्मीरमध्ये हे ठिकाण असून पर्यटक फारसे इकडे फिरत नाहीत. येथे लाकडी घरं आणि किशनगंगा नदीचा निळाशार प्रवाह अनुभवता येतो.
हिमालयाच्या कुशीत वसलेली ही दरी हिवाळ्यामध्ये पूर्णपणे बर्फाखाली असते. निसर्गाचं सानिध्य अनुभवायचं असेल तर हे उत्तम ठिकाण आहे.