संतोष कानडे
जेव्हा आपल्या दोन्ही हातांनी आपण एकाचवेळी वेगवेगळ्या हालचाली करतो तेव्हा मेंदूच्या दोन्ही भागांना सक्रिय व्हावं लागतं.
म्हणजे उजव्या हाताची पाच बोट सरळ करायची आणि डाव्या हाताचं एक बोट सरळ करायचं.
दुसऱ्यावेळी डाव्या हाताची पाच बोटं सरळ करायची आणि उजव्या हाताचं एक बोट सरळ करायचं.
यामुळे तुमची मानसिक शक्ती वाढून परिस्थिती हाताळण्याची क्षमता वाढते. न्यूरोलॉजिकल फेटनेस यामुळे वाढतं.
याला न्यूरोबिक्स किंवा ब्रेन जिम असंही म्हणतात. यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि मेंदू शरीराला वेगाने काम करण्याच्या आज्ञा देतो.
ही ट्रिक फॉलो केली तर डोक्यातला गोंधळ कमी होऊन चपळता येते. मात्र याचा सराव नेहमी करावा लागेल.
तुम्ही एका हाताची पाच बोटं आणि दुसऱ्या हाताचं एक बोट आलटून पालटून उघड-झाक करायची आहेत.
सुरुवातीला तुम्हाला हे कठीण जात असेल तर तुमची मानसिक स्ट्रेन्थ कमी असण्याचं हे लक्षण आहे.