रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या ठिपक्यांच्या टाईल्स का असतात?

Shubham Banubakode

टाईल्सना काय म्हणतात?

प्लॅटफॉर्मवर लावलेल्या या टाईल्सना Tactile Paving किंवा Tactile Guiding and Warning Blocks म्हणतात. त्यांचा मुख्य उद्देश प्रवाशांना मार्गदर्शन करणे हा असतो.

रंग पिवळाच का?

प्लॅटफॉर्मवरची पिवळी पट्टी सहज नजरेत यावी, यासाठी तिचा रंग ठळक ठेवला जातो. त्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्मची कड कुठे आहे, हे समजतं.

ठिपके का असतात?

या टाईल्सवरील उठावदार ठिपक्यांना Tactile Warning Blocks म्हणतात. पायाने किंवा काठीने स्पर्श झाल्यावर ते पुढे धोका असल्याची सूचना देतात.

दृष्टिहीन प्रवाशांना फायदा

दृष्टिहीन किंवा कमी दिसणाऱ्या प्रवाशांना हे उठावदार ठिपके पायाखाली किंवा काठीच्या स्पर्शातून जाणवतात. त्यामुळे पुढचा मार्ग किंवा धोका असल्याचं त्यांना कळू शकतं.

अर्थ वेगळा असतो

टाईल्सवरील ठिपके आणि उठावदार रेषा एकसारख्या नसतात. ठिपके धोका दर्शवतात, तर रेषा प्रवाशांना योग्य दिशेने जाण्यासाठी मार्गदर्शन करतात.

नियमांमध्येही उल्लेख

भारतीय रेल्वेच्या स्टेशन डिझाइन मानकांमध्ये दृष्टिहीन प्रवाशांसाठी dotted guiding blocks आणि प्लॅटफॉर्मच्या कडेसाठी warning system देण्याचा उल्लेख आहे.

फक्त प्लॅटफॉर्मवरच वापर?

अशा tactile टाईल्सचा वापर स्टेशनमधील पायऱ्या, लिफ्ट, एस्केलेटर आणि सबवेकडे जाणाऱ्या मार्गांवरही केला जाऊ शकतो.

टाईल्सचा खरा उद्देश काय?

या टाईल्स केवळ दिसायला वेगळ्या म्हणून लावलेल्या नाहीत. प्रवाशांची सुरक्षितता आणि दृष्टिहीन व्यक्तींना सहज मार्गदर्शन मिळावं, हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो.

साप चावल्यानंतर झोपू का देत नाही?

Why are snake bite victims told not to sleep

|

esakal

हेही वाचा -