Pranali Kodre
भारत आणि इंग्लंड संघात दुसरा टी२० सामना शनिवारी (२५ जानेवारी) झाला.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. बीसीसीआयला अचानक भारताच्या संघात दोन बदल केले आहेत.
नितीश कुमार रेड्डी आणि रिंकू सिंग यांना दुखापतींचा सामना करावा लागला आहे.
नितीश कुमार रेड्डी याला सरावादरम्यान दुखापत (Side strain) झाली होती. त्यानंतर त्याला आता इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित टी२० मालिकेतूनच बाहेर जावे लागले आहे.
रिंकूला कोलकाताला झालेल्या पहिल्या टी२० सामन्यात पाठीमध्ये वेदना जाणवल्या होत्या. त्यामुळे तो देखील दुसऱ्या आणि तिसऱ्या टी२० सामन्यातून बाहेर झाला आहे.
यामुळे बीसीसीआयने भारतीय संघात शिवम दुबे आणि रमणदीप सिंग यांना भारतीय संघात सामील करण्यात आले आहे.
शिवम आणि रमणदीप सध्या रणजी ट्रॉफी खेळत होते. पण आता त्यांना भारतीय संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे.