भारत की न्यूझीलंड ODI मध्ये कोणाचं पारडं भारी; पाहा Head to Head रेकॉर्ड

Pranali Kodre

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अखेरचा साखळी सामना रविवारी (२ मार्च) दुबईमध्ये भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात खेळवला जाईल.

Team India | Sakal

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत आधीच प्रवेश निश्चित केला आहे, पण अ गटात पहिला क्रमांकासाठी या दोन्ही संघात चुरस पाहायला मिळेल.

New Zealand | Sakal

महत्त्वाचे सामने

आत्तापर्यंत भारत आणि न्यूझीलंड संघात अनेक महत्त्वाचे सामने झाले आहेत. त्यात कधी न्यूझीलंडने, तर कधी भारताने बाजी मारली आहे.

India vs New Zealand ODI | Sakal

चुरशीचे सामनेही

गेल्या अनेक वर्षांपासून या दोन संघात अत्यंत चुरशीचे सामनेही झाले आहेत.

India vs New Zealand ODI | Sakal

वनडेत कोण वरचढ?

आत्तापर्यंत भारत आणि न्यूझीलंड संघ वनडेमध्ये ११८ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील ६० वेळा भारताने विजय मिळवला आहे, तर ५० वेळा न्यूझीलंड विजयी झाला आहे. एक सामना बरोबरीत सुटला असून ७ सामने अनिर्णित राहिलेत.

Team India | Sakal

दुबईत पहिलाच वनडे

भारत आणि न्यूझीलंड संघात दुबईमध्ये एकदाही वनडे सामना मात्र झालेला नाही. त्यामुळे दुबईत रविवारी होणारा या दोन संघातील पहिलाच वनडे सामना असेल.

India vs New Zealand ODI | Sakal

चॅम्पियन्स ट्रॉफी

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात भारत आणि न्यूझीलंड हे संघ एकदाच, तेही २००० सालच्या अंतिम सामन्यात आमने-सामने होते. या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत विजेतेपद जिंकले होते.

India vs New Zealand ODI | Sakal

एमएस धोनीचे आहेत 'हे' ५ बिझनेस

MS Dhoni | Sakal
येथे क्लिक करा