Pranali Kodre
भारत आणि न्यूझीलंड संघात पाच सामन्यांची टी२० मालिका २१ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान खेळली जाणार आहे.
Team India
Sakal
फेब्रुवारी-मार्च दरम्यान खेळलेल्या जाणाऱ्या टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेपूर्वी ही मालिका होत असल्याने तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांना महत्त्वाची आहे.
New Zealand Cricket News
Sakal
तसेच न्यूझीलंडने या टी२० मालिकेपूर्वी झालेल्या वनडे मालिकेत भारताला पराभूत केले आहे. त्यामुळे ते टी२० मालिकेत दोन्ही संघ कशी कामगिरी करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल.
New Zealand Cricket News
Sakal
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आत्तापर्यंत २५ टी२० सामने खेळवण्यात आले आहेत.
Team India
Sakal
या २५ सामन्यांपैकी १४ सामने भारताने जिंकले आहेत, तर १० सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. तसेच एक सामना बरोबरीत सुटला आहे.
Team India
Sakal
भारताने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध ११ टी२० सामने खेळले असून यातील ७ सामन्यात विजय मिळवले आहेत. तसेच ४ सामने न्यूझीलंडने भारतात जिंकले आहेत.
Team India
Sakal
भारताची न्यूझीलंडविरुद्ध निचांकी धावसंख्या ७९ राहिली आहे, तर न्यूझीलंडची भारताविरुद्ध ६६ निचांकी धावसंख्या राहिली आहे. सर्वोच्च धावसंख्या भारताची २३४ असून, न्यूझीलंडची २१९ राहिली आहे.
New Zealand Cricket News
Sakal
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा रोहित शर्माने (५११ धावा) केल्या, तर सर्वाधिक विकेट्स इश सोधीने (२५ विकेट्स) घेतल्या.
New Zealand Cricket News
Sakal
India’s U19 & T20 World Cup Winners
Sakal