Pranali Kodre
भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत पहिल्या सामन्यात २० फेब्रुवारीला बांगलादेशला पराभवाचा धक्का दिला.
ही भारताचा कर्णधार रोहित शर्माची १७ वी आयसीसी स्पर्धा आहे. त्यानिमित्ताने आयसीसीने त्याचे प्रत्येक स्पर्धेतील एक फोटो शेअर केले आहेत. त्याच फोटोंवर नजर टाकू
रोहित शर्मा २००७ टी२० वर्ल्ड कप पहिल्यांदा खेळला. हा वर्ल्ड कप भारताने जिंकला होता.
रोहित २००९ टी२० वर्ल्ड कपमध्येही खेळला होता.
रोहित २०१० टी२० वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघाचा भाग होता.
साल २०१२ मध्ये झालेला टी२० वर्ल्ड कपही रोहित भारताकडून खेळला होता.
भारताने जिंकलेल्या २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही रोहित खेळला होता.
रोहित २०१४ टी२० वर्ल्ड कपमध्येही खेळला होता.
रोहित शर्मा २०१५ मध्ये वनडे वर्ल्ड कपमध्येही भारतीय संघाचा भाग होता.
भारतात झालेल्या २०१६ टी२० वर्ल्ड कपमध्येही रोहित खेळला होता.
भारतीय संघ उपविजेता राहिलेल्या २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळला होता.
रोहित २०१९ वनडे वर्ल्ड कपमध्ये खेळला होता.
साल २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या भारतीय संघाचाही रोहित भाग होता.
रोहित शर्मा २०२१ मध्ये झालेला टी२० वर्ल्ड कपही खेळला होता.
साल २०२२ साली झालेल्या टी२० वर्ल्ड कपमध्ये रोहित खेळला होता.
साल २०२१ मध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या भारतीय संघाचे रोहितने नेतृत्व केले होते.
रोहितने २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
भारताने २०२४ टी२० वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वात जिंकला होता.
रोहित आता २०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित भारताचे नेतृत्व करत आहे.