Pranali Kodre
बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा मुंबईत १ फेब्रुवारी २०२५ रोजी झाला.
या सोहळ्यासाठी भारताचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता.
यावेळी या सोहळ्याची एका चर्चा सत्रात भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने रोहितला त्याची मुलगी समायरा क्रिकेट खेळते असं विचारलं.
यावर त्याने सांगितलं की हो आम्ही घरात क्रिकेट खेळतो.
त्यानंतर मानधनाने समायराला बॅटिंग करायला आवडते की बॉलिंग असं विचारलं. त्यावर रोहित म्हणाला सर्वांसारखंच तिलाही बॅटिंग आवडते.
ती घरी शाळेतून उशीरा येते, त्यानंतर तिचे क्लासेसही असतात. ती जिमनॅस्टिक क्लास करते. त्यामुळे त्या सर्व गोष्टींमधून मिळालेल्या वेळेत आम्ही खेळतो.
रोहितनं असंही सांगितलं की ती बॅटिंग करताना बाकी घरातल्या सर्वांना फिल्डिंग करायला लावते.
रोहितने सांगितले की त्याला तिला क्लासेसला घेऊन जायला-आणायला आवडते. त्यामुळे तो वेळ मिळेल, तेव्हा तसं करतो. तो तिला आजी-आजोबांकडेही खेळायला घेऊन जातो.