Pranali Kodre
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी २१ वर्षांच्या नितीश कुमार रेड्डीने शतक करत गाजवली आहे.
त्याने भारताकडून पहिल्या डावात आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत १७१ चेंडू शतक झळकावले.
त्याने शतक केले त्यावेळी त्याचे कुटुंबिय देखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.
त्याने शतक केल्यानंतर त्याचे वडील भावूक झाल्याचेही दिसून आहे. त्याच्या वडिलांचा त्याच्या यशात मोठा वाटा राहिला आहे.
त्याच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडिलांनी त्यांची सरकारी नोकरी सोडली होती.
२६ मे २००३ रोजी जन्मलेला नितीश त्याच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. त्याच्या वडिलांचे नाव मुत्याला रेड्डी आहे.
त्याची आईचे नाव मानसा ज्योत्साना आहे. त्यांनीही पतीने मुलासाठी नोकरी सोडल्यानंतर त्यांना खंबीर पाठिंबा दिला आणि घरची अर्थिक स्थिती सांभाळली.
नितीशला एक मोठी बहीण असून तिचे नाव तेजस्वी रेड्डी आहे.