Pranali Kodre
स्टार फलंदाज रोहित शर्मा भारतातील लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याचा मोठा चाहतावर्ग देशभरात पाहायला मिळतो.
यामुळे त्याचे चाहते त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टीही जाणून घेण्यास उत्सुक असतात.
त्याला आवडता खाण्याचा पदार्थ वडापाव असेल, असे अनेकांना वाटते. परंतु तसे नाही.
रोहितने एका मुलाखतीमध्ये त्याच्या आवडत्या पदार्थाबद्दल खुलासा केला होता.
त्याने सांगितले होते की त्याला डाळ-भात खायला सर्वात जास्त आवडते.
त्याने सांगितले की डाळ-भात खातच तो लहानाचा मोठा झाला आहे.
त्याने असंही सांगितलं की त्याचं कुटुंब दाक्षिणात्य भागातील असल्याने त्यांच्या घरात रसमही केले जायचे, जे त्याला भातासोबत आवडते.
त्याने म्हटले होते की जगात कुठेही गेलं तरी भारतीय रेस्टॉरंटमध्ये डाळ तर मिळतेच. त्यामुळे त्याला डाळ-भात खायला आवडते.