Pranali Kodre
भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचा (WTC) अंतिम सामना खेळण्याचे स्वप्नही तुटलंय. पण आता झाल्या गोष्टी विसरून भारताला पुढे जावंच लागणार आहे.
WTC च्या नव्या पर्वात म्हणजेच २०२५ ते २०२७ दरम्यान भारताला इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका दौऱ्यात कसोटी मालिका खेळायच्या आहेत, तर मायदेशात ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिका खेळायच्या आहेत.
एकूणच आगामी WTC स्पर्धेतही भारताला अंतिम सामना गाठायचा असेल, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड अशा बलाढ्य संघांचं आव्हान पार करावंच लागणार आहे.
अशात या स्पर्धेचे नक्की नियम असतात काय असा प्रश्न पडला असेलच. तर तेच जाणून घेऊ.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजयी टक्केवारीनुसार पाँइंट्स टेबलमधील संघांचे स्थान ठरते.
प्रत्येक संघाला ६ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ३ मालिका घरच्या मैदानात, तर ३ मालिका परदेशात खेळाच्या असतात.
प्रत्येक सामन्यात मिळणाऱ्या पाँइंट्सनुसार टक्केवारी ठरते.
प्रत्येक सामन्यात विजय मिळणाऱ्या संघाला १२ पाँइंट्स म्हणजेच १०० टक्के, सामना जर बरोबरीत सुटला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी ६ पाँइंट्स मिळतात, म्हणजेच ५० टक्के. सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना प्रत्येकी ४ पाँइंट्स मिळतात म्हणजेच ३३.३३ टक्के.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशीही सामन्यातील प्रत्येक स्लो ओव्हरसाठीही एक पाँइंट कापला जातो. त्यामुळे त्याचा परिणाम टक्केवारीवरही होतो.
पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल दोन क्रमांक मिळवणारे संघ अंतिम सामना खेळतात.