Pranali Kodre
भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन क्रिकेटपटू निवृत्ती घेतल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात दिसला आहे.
आता त्याने प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटमध्येही मोठं पाऊल टाकले आहे.
शिखरने गुरुग्राममधील DLF च्या 'द डॅलियाज' प्रोजेक्टमध्ये महागडे आणि आलिशान घर विकत घेतले आहे.
गुरुग्राममधील गोल्फ कोर्स रोडवर वर 'द डॅलियाज' हा मोठा हाउसिंग प्रोजेक्ट आहे.
धवनने या हाउसिंग प्रोजेक्टमध्ये खरेदी केलेलं घर ६,०४० चौरस फूट क्षेत्रफळाचे आहे.
धवनने खरेदी केलेल्या घराची किंमत ६५.६१ कोटी रुपये असून त्यावर ३.२८ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागली आहे.
त्यामुळे घराची एकूण किंमत जवळपास ६९ कोटींमध्ये गेली आहे.
CRE Matrix या रिअल इस्टेट डेटा फर्मने दिलेल्या माहितीनुसार या घराचे डिल ४ फेब्रुवारी २०२५ रोजी नोंदवले गेले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खुलासा झाला होता की शिखर सोफी शाईनसोबत रिलोशनशिपमध्ये आहे. त्यामुळे आता तो नव्या घरात तिच्यासोबत राहणार का, अशा चर्चा होत आहे.