Pranali Kodre
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा बऱ्याचदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्तेत येत असते.
तिचे नाव स्टार क्रिकेटपटू शुभमन गिल सोबतही काही वर्षांपासून जोडलं गेलं होतं.
मात्र, काही दिवसांपूर्वीच गिने तो सिंगल असून क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत असल्याचे सांगितले होते.
याचदरम्यान काही दिवसांपूर्वी असे रिपोर्ट समोर आले होते की सारा स्टार अभिनेचा सिद्धांत चतुर्वेदीसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत.
पण, आता सारा आणि सिद्धांत यांच्यात ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार एका सुत्राने सांगिलले आहे की सारा आणि सिद्धांत एकमेकांच्या कुटुंबियांना भेटले होते. त्यानंतर सिद्धांतने हे नातं संपवलं आहे.
दरम्यान, कुटुंबियांच्या भेटीमुळे त्यांचं नातं बिनसलं आहे की आणखी काही कारणामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आला आहे, याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
सारा तेंडुलकर 'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'ची डायरेक्टर आहे.
सिद्धांत चतुर्वेदीने गली बॉय, गेहराईया, खो गये हम कहा अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.