Pranali Kodre
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील ऍडलेडला ६ डिसेंबरपासून झालेला दुसरा कसोटी सामना दिवस-रात्र आहे. त्यामुळे गुलाबी चेंडूने खेळला जात आहे.
पण, क्रिकेटमध्ये नेहमी वनडे किंवा टी२० क्रिकेट पांढऱ्या चेंडूने, तर दिवसाचे कसोटी क्रिकेट लाल चेंडूने खेळला जातो.
पण दिवस-रात्र कसोटी सामना गुलाबी चेंडूने का खेळला जातो, हे माहित आहे का?
कसोटी क्रिकेटमधील रस चाहत्यांमध्ये वाढवण्यासाठी दिवस-रात्र प्रकारात कसोटी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
परंतु, संध्याकाळी किंवा रात्री नेहमीचा लाल चेंडू खेळाडूंना दिसण्यास त्रास होईल, हे लक्षात आले.
त्यामुळे पिवळा आणि केशरी रंगाच्या चेंडूचा विचार करण्यात आलेला, पण हा रंग आणि खेळपट्टीचा रंग यांचं मिश्रण फलंदाजांना त्रासदायक ठरू शकलं असतं. त्यामुळे गुलाबी रंग वापरण्याचा आला.
गुलाबी रंग संध्याकाळी किंवा रात्री दिसतो, त्यामुळे याच रंगाचा चेंडू वापरायचं ठरलं.
लाल आणि पांढऱ्या रंगाप्रमाणेच गुलाबी चेंडूतही रबर, कॉर्क आणि वूलन यार्न वापरलं जातं. पण गुलाबी चेंडूवर पेंटचा अधिकचा थर असतो, ज्यामुळे रंग लगेच उडणार नाही.
त्याशिवाय या चेंडूवर लाखेच्या लेपाचा एक ज्यादाचा थर असतो. ज्यामुळे चेंडू अधिक वेळ नवीन राहतो.