इंजिनियर असलेले ६ भारतीय क्रिकेटपटू

Pranali Kodre

अंभियंता दिवस

१५ सप्टेंबर रोजी भारतात अंभियंता दिवस (Engineer's Day) साजरा केला जातो.

Engineer's Day

|

Sakal

इंजिनियर असलेले खेळाडू

पण तुम्हाला माहित आहे का की भारतीय क्रिकेट संघाकडून खेळलेले काही खेळाडूंनीही इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. अशात काही खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Anil Kumble

|

Sakal

इरापल्ली प्रसन्ना

भारताचे दिग्गज फिरकी गोलंदाज इरापल्ली प्रसन्ना यांनी म्हैसूरमधील नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंगमधून बायोमेकॅनिक्स आणि ऍरोडायनामिकमध्ये पदवीचे शिक्षण घेतले आहे.

EAS Prasanna

|

Sakal

के श्रीकांत

भारताचे माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये चेन्नईतील कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

K Srikkanth

|

Sakal

अनिल कुंबळे

भारताचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज अनिल कुंबळे मॅकेनिकल इंजिनियर आहे. त्याने बंगळुरूमधील राष्ट्रीय विद्यालय कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

Anil Kumble

|

Sakal

आर अश्विन

भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बी. टेकची पदवी चेन्नईतील एसएसएन कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून पूर्ण घेतली आहे.

Ravichandran Ashwin

|

Sakal

जवागल श्रीनाथ

भारताचा दिग्गज वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी इंस्ट्रुमेंटल टेक्नोलॉजीमध्ये बी.ई डिग्री म्हैसूरमधील जयचामराजेंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंगमधून पूर्ण केली आहे.

Javagal Srinath

|

Sakal

श्रीनिवासन वेंकटराघवन

भारताच्या सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक असलेल्या श्रीनिवासन वेंकटराघवन यांनी त्यांच्या खेळाडू म्हणून कारकिर्द पूर्ण केल्यानंतर इंजिनियरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

Srinivasaraghavan Venkataraghavan

|

Sakal

हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरुद्ध पहिल्याच चेंडूवर विकेट घेत केला मोठा विक्रम

Hardik Pandya

|

Sakal

येथे क्लिक करा