वनडे वर्ल्ड कपमध्ये 'Playaer of The Tournament' पुरस्कार जिंकणारे ४ भारतीय

Pranali Kodre

भारतीय महिला संघ विश्वविजेता

नवी मुंबईत २ नोव्हेंबर रोजी भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास घडवला.

India Women Cricket Team

|

Sakal

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ५२ धावांनी विजय मिळवला.

Deepti Sharma

|

Sakal

दीप्तीने उचलला मोलाचा वाटा

भारतीय महिला संघाला हे विश्वविजेतेपद मिळवून देण्यात अष्टपैलू दीप्ती शर्माने मोलाचा वाटा उचलला.

Deepti Sharma

|

Sakal

दीप्ती शर्माची कामगिरी

दीप्तीने वनडे वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत ९ सामन्यांत सर्वाधिक २२ विकेट्स घेतल्या. तसेच तिने ३ अर्धशतकांसह २१५ धावाही केल्या.

Deepti Sharma

|

Sakal

सर्वोत्तम खेळाडू

त्यामुळे दीप्ती शर्माला या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.

Deepti Sharma

|

Sakal

चौथी भारतीय क्रिकेटर

महिला किंवा पुरुषांच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (Player of the Tournament) ठरणारी ती भारताची चौथी खेळाडू ठरली.

Deepti Sharma

|

Sakal

सचिन तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर २००३ वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवला होता. त्यावेळी त्याने ६७३ धावा ठोकल्या होत्या आणि २ विकेट्स घेतले होते.

Sachin Tendulkar

|

Sakal

युवराज सिंग

अष्टपैलू युवराज सिंगने २०११ वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. त्याने ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ विकेट्स घेतल्या होत्या.

Yuvraj Singh

|

Sakal

विराट कोहली

विराट कोहलीने २०२३ वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला. त्याने ७६५ धावा केल्या होत्या आणि १ विकेट घेतली होती.

Virat Kohli

|

Sakal

भारताच्या सर्वात श्रीमंत तीन महिला क्रिकेटर

Smriti Mandhana - Harmanpreet Kaur

|

Sakal

येथे क्लिक करा